नको भिती कोरोनाची, काळजी घेऊया आरोग्याची

Rituraj Patil - Satej Patil

कोल्हापूर : नको भिती कोरोनाची(Corona Virus), काळजी घेऊया आरोग्याची, अशा आशयाचा सोशल मिडीयावर पालकमंत्री सतेज पाटील(Satej Patil) आणि आमदार ऋतुराज पाटील(Rituraj Patil) यांनी दिलेला संदेश कोल्हापुरात सोशल मिडीयावर लोकप्रिय ठरत आहे. कोरोना काळात प्रतिकार शक्ती कशी वाढवावी याबाबत नामदार आणि आमदारांनी दिलेली माहिती कोरोना महामारीच्या भितीच्या छायेत लोकांना दिलासा देणारी ठरत आहे.

योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व व्यायाम करावे. सकारात्मक व आनंदी कृतीसाठी संगीत, वाचन आदी छंद जोपासा. ताजे, सकस व पचायला हलका आहार घ्या.यामध्ये पालेभाजी. डाळी यांचा समावेश करावा. कुटुंबियांशी, मित्रमैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोला. पुरेशी झोप घ्या. कोमट पाण्यात मीठ किंवा सेंदोलिन घालून दोन वेळा गुळण्या कराव्यात. चहा, कॉफी ऐवजी आले, ओवा, काळी मिरी, दालचिनी, लवंग, तुळस, पुदिना व गवती चहा यांचा समावेश असलेला काढा दिवसातून 2 ते 3 वेळा घ्यावा. दिवसभरात अडीच ते तीन लीटर कोमट पाणी प्यावे. जेवणापूर्वी अर्धा कप कोमट पाण्यात आले, लिंबू, हळद यांचे मिश्रण घ्यावे. टोमॅटो , पालक, कोबी, मोसंबी, संत्रे, लिंबू , आवळा, केळी, ढबू मिरची यांचा आहारात समावेश करावा. तेलकट, मसालेदार, जंक फूड, थंड पेय तसेच फास्ट फूड टाळावे. दिवसातून दोन वेळेला सकाळी 8 वा. आणि सायं. 6 वा. वाफ घ्यावी. त्यात पाण्यामध्ये चार थेंब निलगिरी तेल, थोडी दालचिनीा, एक किंवा दोन लवंग लवंग घालाव्यात. असे आवहन पालकमंत्री सतेज पाटील आणि आ. ऋतुराज पाटील यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER