पर्यावरणाला धोका पोहचवून केलेला विकास नकोय : उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई : “मुंबईलगतच्या रायगड जिल्ह्यात लोकसंख्या वाढत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही, तर भविष्यात समस्या निर्माण होईल. वेळेत नव्हे तर वेळेआधी हा प्रकल्प पूर्ण करा, त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. रायगडच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा आहे.” असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजना भूमीपूजन सोहळा पार पडला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “कालच मी फेसबुक लाईव्हमधून प्रेमाने आणि हक्काने सुचना दिल्या होत्या. एकीकडे मी सांगतोय की, सार्वजनिक कार्यक्रम करू नका आणि आज आपण हा रायगड येथील कार्यक्रम करतोय, पण हा कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि पाण्याशी संबंधित आहे. मी आयोजकांना धन्यवाद देतो की, त्यांनी आरोग्याचे काटेकोर नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित केला.”

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, “पाणी म्हणजे आयुष्य आहे, विकासाच्या अनेक गोष्टी आपण करतोय. मेट्रोचे कोचेस देशात बनवतो आहोत, उद्या आपल्या राज्यातही हे कोचेस बनतील. अनेक गोष्टी आपण उत्पादित करू शकतो, मात्र पाणी आपण बनवू किंवा निर्माण करू शकत नाही, हे सत्य आहे. एकदा हे स्वीकारल्यानंतर मग आपल्या हाती असते, ते उपलब्ध पाणी कसे जपून वापरू.” नीती आयोगाच्या बैठकीत ते म्हणाले की, “ज्या विकासाच्या मागे आपण लागलो आहोत, ते करताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये. कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे, दुसरीकडे समुद्र किनारे आहेत, पण पर्यावरणाला धोका पोहचवून केलेला विकास आपल्याला नकोय”

वनसंपदा का नष्ट करायची?

“सुरुवातीच्या कोरोना काळात सुविधा मिळत नव्हत्या. काही महिन्यापूर्वी प्रदूषणाची पातळी कमी झाली होती. आता परत हवेचे प्रदूषण वाढले आहे. यामुळे श्वसनाचे आजार वाढले आहेत. प्रदूषणकारी राक्षस आपल्याला परवडणार नाही. हा जीवघेणा विकास आहे. लोकसंख्येपासून दूर किंवा काही कारखान्यांची नितांत गरज असलेल्या वाळवंटी भागात सुविधा उभारून वनसंपदा नष्ट का करावीत?” असेसुद्धा ठाकरे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER