राजकीय पोळी भाजण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा वापर नको : सचिन सावंत

Sachin Sawant

कोल्हापूर : औरंगाबादला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी नेमकं महापालिका निवडणूकांच्या तोंडावर पुढं कशी येते, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज कोल्हापुरात केला. स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा वापर करणं अयोग्य आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवरही अप्रत्यक्षरित्या टीका केली.

कॉंग्रेस प्रवक्ते सावंत हे आज कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुठभर भांडवलदारांचे हित जोपासण्यासाठी सरकारने कृषी कायदे लादले आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा बळी पडला. तरीही सरकार त्याची दखल घेताना दिसत नाही. उलट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते या आंदोलनाची खिल्ली उडवत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहेत. या भावना अधिक तीव्र होवून शेतकरीच हा कायदा मोडून काढतील यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER