मराठा समाजाची दिशाभूल करत एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका’ – आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई : सर्वोच्च नायायालयाने (Supreme court) राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण (Maratha reservation) रद्द केले. त्यानंतर आरक्षणाच्या मुद्य्यावारून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. एकीकडे राज्य सरकारने राज्यपालांना आरक्षणाच्या प्रश्नाबाबत निवेदन दिलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून सतत टीका केली जात आहे. भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आता सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळं हास्यास्पद कार्य सुरु असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. त्याचबरोबर सरकारनं सर्वोच्च न्यायालयासमोर मराठा आरक्षणातले महत्त्वाचे मुद्दे नीट मांडले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मराठा समाजाची दिशाभूल करत समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका अशा शब्दात त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोच चव्हाण यांनी आरक्षणाचं जाऊद्या, सवलती द्या अशी भूमिका घेतली आणि काल मंत्री राज्यपालांची भेट घेताना आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. या त्यांच्या भूमिकेमुळे आता तुम्हाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे सरकार मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाबद्दलच्या गायकवाड अहवालाचं भाषांतर करण्यात आलं नाही आणि त्यामुळे या अहवालातले प्रमुख मुद्दे योग्य पद्धतीने समोर आले नाहीत. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुसूत्रता नसल्याची टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button