सणांबाबत शहाणपण शिकवू नकोस; शिवभक्तांनी सोनू सूदला सुनावले

Sonu Sood

मुंबई :- लॉकडाऊन काळात गरजूना मदत केल्यामुळे हिरो ठरलेला अभिनेता सोनू सूदचे ट्विट कुणाला तरी मदत किंवा कुणाची तरी वेदना जाणणारे असते. यासाठी नेटीजन्स त्याचे कौतुकही करतात पण, त्याने महाशिवरात्रीबाबत केलेल्या ट्विटमुळे सध्या तो ट्रोल होतो आहे. #WhoTheHellAreUSonuSood असा हॅशटॅगही ट्रेंड होतो आहे.

महाशिवरात्रीनिमित्त सोनूने आज ट्विट केले. ‘शिव भगवान की फोटो फॉरवर्ड करके नहीं किसी की मदद करके महाशिवरात्री मनाएं, ओम नम: शिवाय,’ यावरून अनेक नेटीजन्स भडकले. आणि #WhoTheHellAreUSonuSood या हॅशटॅगसह अनेकांनी त्याला ट्रोल केले.

एका यूजरने सुनावले – कृपा करून आम्हाला हिंदूंबद्दल फुकटचे ज्ञान देऊ नकोस. काही युजरने सोनूच्या एका जुन्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत त्याला ट्रोल केले. यात त्याने ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ‘इतके ज्ञान कुठून आणतोस, ते सुद्धा फक्त हिंदू सणांबद्दल. माय फेस्टिवल, माय चॉईस.’

तू लॉकडाऊनदरम्यान लोकांची मदत केली, ही चांगली गोष्ट आहे. पण, म्हणून हिंदूंनी त्यांचा सण कसा साजरा करावा, हे सांगण्याचा अधिकार तुला मिळत नाही,’ या शब्दात एका युजरने त्याला सुनावले.

काहींनी सोनूला सपोर्टही केला. लॉकडाऊनमध्ये हजारो लोकांच्या मदतीसाठी उभा झालेला हाच एकमेव रिअल हिरो होता, अशा आशयाचे अनेक मॅसेज सोनूच्या चाहत्यांनी केलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER