‘मला हिंदू धर्म शिकवू नका, मी हिंदू ब्राह्मणाची मुलगी’; बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

Mamta Banrjee - Maharastra Today

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनपेक्षितपणे हिंदू कार्ड खेळायला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत त्यांनी अनेक हिंदू मंदिरांचे दर्शन घेतले. तर दुसऱ्या टप्प्यातही त्यांनी हिंदू कार्ड बाहेर काढले आहे. ‘सर्व जाती-धर्माचे लोक समान आहेत.’ अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला.

‘दुसऱ्याला चोर म्हणाले स्वत: डाकुंचे सरदार’

“मी लोकांमध्ये भेदभाव करणार नाही. मला आई-वडिलांनी भेदभाव करायला शिकवले नाही. माझ्या घरात ज्या बाउरी महिला काम करतात. सर्वांना नोकरी दिली आहे. ते सगळ्यांना चोर म्हणत आहेत. स्वत: ते डाकुंचे सरदार आहेत. भाजप काय करतेय? नोटबंदीचा पैसा कुठे गेला? बँकांचा पैसा कुठे गेला? सर्व काही विक्री काढत आहेत आणि आता बंगालचा सोनार बांग्ला करण्याच्या बाता मारत आहेत. सोनार बांग्लाही बोलू शकत नाहीत. सोनार बांग्लाला शोनार बांग्ला म्हणत आहेत. रविंद्रनाथ टागोर यांची जन्मभूमी जोडासांकू सांगतात. विद्यासागर यांची मूर्ती तोडतात. गुजरातमधील दंगलीचे नायक आहेत. जर दंगा करतील, तर माझ्यात पंगा घेण्याची ताकद आहे.” अशा शब्दात ममता यांनी पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले आहे.

पहिला प्रचार थंडावला

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावला आहे. २७ मार्च रोजी ५ जिल्ह्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यातील बाकुंडा जिल्ह्यातील, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील ६, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील ७, झाडग्राम जिल्ह्यातील ४ तर पुरुलिया जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान शनिवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत असणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी मतदान होणार आहे. यातील सर्व बूथ संवेदनशील आहे. पहिल्या टप्प्यात १ लाख १ हजार ७९० मतदान केंद्र आहेत. तर मतदारांची संख्या ७३ लाख ८० हजार ९४२ आहे. सर्व संवेदनशील बूथवर केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान तैनात असणार आहेत. तशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. तर मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात पश्चिम बंगाल पोलीस असणार नाहीत. याबाबत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला होता. पण निवडणूक आयोगाने तो फेटाळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER