काँग्रेसने छत्रपतींचा सन्मान कसा करावा हे भाजपला शिकवू नका; प्रवीण दरेकरांनी सुनावले खडेबोल

Pravin Darekar

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर नाराजी व्यक्‍त केली. मराठा समाजाला भाजपने आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपनेच केले. त्यामुळे मराठा समाजाची नेहमीच फसवणूक करणाऱ्या काँग्रेस पक्षाने छत्रपतींचा सन्मान कसा करावा, हे भाजपला शिकवू नये, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजीराजे भोसले यांना मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी वेळ दिला नाही. ‘कंगना रानौत व प्रियांका चोप्रा यांना भेटण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ आहे, पण संभाजीराजेंसाठी वेळ नाही. हा महाराष्ट्राचा अवमान आहे.’ असे ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले होते. सावंंत यांच्या या टीकेला दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“१९९९ पासून १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात तर दहा वर्षे केंद्रात सत्ता होती. फडणवीस सरकारच्या काळात भाजप सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले व ते हायकोर्टातही टिकवले. आमचे सरकार होते, तोपर्यंत सुप्रीम कोर्टातही मराठा आरक्षणाला स्थगिती आली नाही. त्यावेळी चंद्रकांत पाटील हे आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांना कायदेशीर बाजू चांगली समजते. त्यामुळे ज्यांना आरक्षण टिकवता आले नाही, त्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी चंद्रकांतदादांना आरक्षणाची कायदेशीर बाजू शिकवू नये. तुम्हला जमत असेल तर सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करा.” असे खडेबोल दरेकर यांनी सुनावले आहे.

“काँग्रेसने कोल्हापूरच्या छत्रपतींचा काय सन्मान केला, हे आधी सचिन सावंत यांनी सांगावे. कधीतरी काँग्रेसकडून आमदारकी मिळेल या आशेवर असलेल्या सावंत यांनी उगाच उठाठेव करू नये.” असा टोला दरेकरांनी हाणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button