पश्चिम बंगाल, केरळची गर्दी इथे दाखवू नका; अजित पवारांनी काढला माध्यमांना चिमटा

Ajit Pawar

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील कोरोना स्थिती आणि त्यावरील कडक निर्बंधांवर बोलताना माध्यमांनाही चिमटा काढला. यावेळी अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचे लोक म्हणतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये निवडणुका आहेत. तिकडेही गर्दी होते, मग महाराष्ट्रात निवडणुका का नको? त्यामुळे टीव्ही चॅनलवाल्यांनी देशातील इतर ठिकाणचे गर्दीचे व्हिडीओ महाराष्ट्रात दाखवत बसू नये. तिथं निवडणूक असल्याने थोडंसं हे घडणार; परंतु ती निवडणूक संपल्या संपल्या तिथं बाकीची नियमावली कडक केली जाईल, असेही अजित पवार म्हणाले.

आज रविवार आहे, बैठक आहे, हे तुम्हाला कुणी सांगितलं होतं का? तरीही तुम्ही इथं आलात. मला आज दुपारी मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि त्यांनी तातडीची बैठक घ्यावी लागत असल्याचं सांगितलं. लगेच तुम्ही १०-२० कॅमेरे आलेच ना. तुम्ही १०-२० जण आणि तुमच्यासोबत आणखी काही लोक असे लोक जमत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.

अजित पवार म्हणाले, आम्हालाही लॉकडाऊन करायला फार समाधान वाटत नाही. परंतु इतके दिवस आपण सातत्याने सर्वांना सांगतोय की, प्रत्येकाने काळजी घ्या. प्रत्येकाने नियमांचं पालन करा, कडक भूमिका घेण्याची वेळ येऊ देऊ नका. मागच्या वर्षी लोकांच्या मनात कोरोनाची भीती असल्याने नियमांचं तंतोतंत पालन झालं. मात्र आता तसं होताना दिसत नाही.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला कोरोना निर्बंधांमधून सूट देण्यात आली. कारण ही भारत सरकारने लावलेली निवडणूक आहे. आज झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ३१ मार्चला मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जिथं इलेक्शन आहे तिथं ते जाहीर झालं असल्यानं तिथं सर्वच राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि उमेदवार या सर्वांनी मिळून कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button