मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाविना आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नका: शरद पवार

sharad-pawar-uddhav-thackeray-anil-deshmukh

मुंबई :- राज्यात २ जुलैला झालेल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल चर्चा झाली . या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या आदेशाविना आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नका , असे पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना म्हटले आहे . तसेच पुन्हा असे होऊ नये, असे पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत देशमुखांना सांगितले.

ही बातमी पण वाचा : पुण्यात कोरोनाचा कहर; अजित पवारांच्या आदेशानंतर चार आयएएस अधिका-यांची नियुक्ती

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणतीही पूर्वसूचना न देता 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश दिले होते . मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या मुंबईतील अंतर्गत बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे

दरम्यान मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना महत्त्व होते. डॉ. रश्मी करंदीकर, शंकर शिंदे, परमजीत सिंग दहिया, संग्रामसिंग निशाणदार, प्रशांत कदम, शहाजी उमप, मोहन दहीकर अशा 12 उपायुक्तांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने गुरुवारी काढले होते, मात्र त्याला अवघ्या तीन दिवसात स्थगिती मिळाली आहे. याचे नेमके कारण अस्पष्ट आहे. आमच्या सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER