
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी ठिकठिकाणी प्रचार सभांचा धडाकाच लावला आहे . शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येवला-लासलगाव मतदारसंघात प्रचार सभा झाली. यावेळी ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला . “येवल्याच्या विकासासाठी ‘वचननामा’ करावा लागला. मग सत्तेसाठी आमदार काय करत होते? त्यामुळे आता वेळ आलेली आहे. इथला पाहुणा निवडून देऊ नका. हे पार्सल पाठवून द्या. कुठेही पाठवा पण मुंबईत पाठवू नका, अशा शब्दात उद्धव ठाकरेंना भुजबळांवर तोफ डागली .
ही बातमी पण वाचा:- बाळासाहेबांच्या अटकेवर भुजबळांचे स्पष्टीकरण
येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची शनिवारी सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना झालेल्या अटकेवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. युती आणि आघाडीतील पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही प्रचाराची धुरा सांभाळली आहे .
दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची चूकच होती. फक्त काही वरिष्ठांच्या हट्टापायी ही कारवाई करण्यात आली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.अजित पवारांच्या या वक्तव्यावरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे .
अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर ती चूक छगन भुजबळांची होती, असे नाव घेवून सांगावे. विभागाचे प्रमुखांची ती चूक होती, असे ते सांगत असले तरी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणार्यांचे बाप होते, हे विसरता येणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.