जसा गोरगरिबांचा तांदूळ विकला, तशी लस विकू नका म्हणजे झालं ! भातखळकरांचा टोला

atul bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला असताना आता कोरोना प्रतिबंध लसीच्या तुटवड्यावरून राज्य आणि केंद्र शासनात दावे-प्रतिदावे करताना दिसून येत आहे. यावरून जोरदार राजकारणही होताना दिसून येत आहे; कारण लसीच्या तुटवड्यावरून आता भाजप (BJP) नेते आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते समोरासमोर आले आहेत. राज्यात पुढील दोन-तीन दिवस पुरेल इतकाच कोरोना (Corona) लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. आता भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनीही ठाकरे सरकारवर (Thackeray Goverment) गंभीर आरोप करत जोरदार टोला लगावला आहे.

ही बातमी पण वाचा :  केंद्राने आठवड्याला लागणारी ४० लाख लसींची गरज लक्षात घ्यावी : राजेश टोपे

‘गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगलेले लोक ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत म्हणून भीती वाटते, दुसरं काय?’ असं ट्विट  करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला. दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवस पुरेल एवढाच लसींचा  साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना सांगितलं. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली.

महाराष्ट्राला वेळेत पुरवठा झाला नाही तर तीन दिवसांत लसीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केली. त्यावर एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला फटका बसल्याची टीका डॉ. हर्षवर्धन यांनी केली. महाराष्ट्र सरकारकडून पुरेशा कार्यक्षमतेची कमतरता आता दिसू लागली आहे. त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागत आहेत, असंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय. डॉ. हर्षवर्धन (DR.Harshwardhan) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक परिपत्रकच टाकून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button