मराठा तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका, भाजपचा सरकारला इशारा

Pravin Darekar

मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या राज्यात चांगलाच गाजत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ९ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत या आरक्षणावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कायम ठेवली. त्यानंतर, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाबतीत राज्य शासन गंभीर नसल्याचे आरोप राज्यातील भाजपा (BJP) नेत्यांकडून पाहायला मिळाले. महत्त्वाची सुनावणी असताना राज्य सरकारचा एकही मंत्री किंवा महाधिवक्ता दिल्लीत सुनावणीला हजर नसल्याच्या मुद्द्यावरूनही खूप टीका करण्यात आली. त्यानंतर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्य सरकारला इशारा दिला.

प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला. त्यात काही मराठा तरूण आंदोलन करताना दिसले. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजीही होताना दिसली. यासोबतच त्यांनी एक ट्विटदेखील केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. “आघाडी सरकारचं मोघलाईचं राज्य सुरु आहे. आंदोलनकर्त्या मराठा तरुणांवर केसेस दाखल करण्यात आल्या. अधिवेशन चालू असताना लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे. तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका,” असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER