शेतकऱ्यांचा अंत बघू नका, अन्यथा…पवारांचा मोदी सरकारला इशारा

Sharad Pawar - Narendra Modi

मुंबई :- जवळपास १५ दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे कायदे रद्द करा अशी मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षांनी केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, हे कायदे घाईघाईने मंजूर करण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांशी चर्चा न करता मंजूर केले. कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी आंदोलनावर वेळीच निर्णय घेण्याची गरज आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता, त्यामुळे त्या अन्नदात्याचा अंत बघू नये, केंद्र सरकारने या कायद्यात तत्काळ फेरबदल करावा. अन्यथा शेतकऱ्यांचे आंदोलन देशभरात पसरेल, असा इशारा पवारांनी दिला.

ही बातमी पण वाचा : शेतकऱ्यांची चिंता वाढली, मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER