राजीनामा देऊ नका, भाजपात राहूनच आरक्षण मिळणार; नारायण राणेंचा संभाजीराजेंना सल्ला

Narayan Rane - Sambhaji Raje

सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) हे अधिकच आक्रमक झाले आहेत. कालपासून त्यांनी विविध पक्षांतील नेत्यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तर आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारला (Thackeray Government) इशारा दिला. तर दुसरीकडे त्यांनी मराठा आरक्षणासाठी भाजपनं दिलेली खासदारकी सोडण्यास तयार असल्याचं बोलून दाखवलं. त्यावरूनच आता भाजप (BJP) नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) संभाजीराजेंना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजीनामा देऊ नये, योग्य व्यक्तींना भेटल्यास, त्यांच्याशी चर्चा केल्यास आरक्षणाचा तिढा सुटेल. तुम्ही राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही. काहीही साध्य होणार नाही. तुम्ही जी मोहीम हातात घेतली, ती भाजपात राहूनच केल्यास लवकरात लवकर आरक्षण मिळेल. त्यामुळे राजीनामा न देता योग्य व्यक्तींना भेटलात, ज्यांच्यात आरक्षण देण्याची क्षमता आहे, तर प्रश्न सुटू शकतो. मात्र तुम्ही राजीनामा देऊ नये, अशी विनंती नारायण राणे यांनी संभाजीराजेंना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button