‘अजिबात वीज बिल भरू नका!’ राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

Raj Thackeray

मुंबई : वाढीव वीज बिलाविरोधातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला आहे. ‘वीज बिल भरू नका’, असे  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले  आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेला गृहीत धरू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

या सरकारला आर्जवांची भाषा समजत नाही. सरकार जनतेला लुटण्याचे काम करत आहे. आता मोर्च्याच्या  माध्यमातून समजावण्याची वेळ आली आहे. प्रचंड वीज बिलांद्वारे सरकारनं जनतेला शॉक दिला आहे. सरकारनं वीज बिलांमधून ‘जिझिया कर’ लावला आहे.

राज्य सरकारकडून जनतेची लूट केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.सरकारने तत्काळ वीज बिलात सवलत दिली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.जर का कोणी तुमचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलं तर फक्त जवळपासच्या मनसे कार्यकर्त्याला फोन करा आणि मग परिणाम पाहा, असं आवाहन मनसेनं नागरिकांना केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER