वीज बिलं भरू नका; ५० टक्के सवलतीचा निर्णय कुणी रद्द केला? – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

नांदेड : लोकांनी वीज वापरली असेल तर बिल भरावेच लागेल, वीज बिलात कुठलीही माफी अथवा सवलत नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितले. यावर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जनतेला आव्हान केले – वीज बिल भरू नका. त्यांनी प्रश्नही विचारला आहे – लॉकडाऊन काळातील वीज बिलात  ५० टक्के सवलतीचा निर्णय कुणी रद्द केला? विजेचे बिल भरू नका, असे आवाहन पत्रपरिषदेत करताना आंबेडकर यांनी दावा केला की, बिल न भरल्यास ५० टक्के सवलत मिळेल.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणाले की, ऊर्जामंत्री नितीन राऊत वारंवार सांगत होते, आम्ही काही ना काही मदत करू, दिवाळीला गोड बातमी देऊ. सक्तीची वसुली करा ही गोड बातमी? सरकारमधील मंत्री अशा प्रकारे बेजबाबदार विधान करत असतील तर सरकारवरचा आणि मंत्र्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास उडेल. आम्ही वीज बिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसे उत्तर देऊ. रस्त्यावर उतरू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

मनसेही आक्रमक
‘लॉकडाऊन दरम्यान जनतेला आलेले वाढीव वीज बिल माफ व्हावे यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली. काही वेळा आमच्या कार्यकर्त्यांनी कायदाही हातात घेतला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहिले. पण त्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही. ऊर्जामंत्र्यांनी वीज बिल माफ होणार नाही असे जाहीर केले. लोकांकडून बळजबरीने वीज बिल घेतले जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER