वीज बिल ५० टक्के माफ होत नाही तोपर्यंत भरू नका – रामदास आठवले

Ramdas Athawale.jpg

मुंबई : वीज बिलाची मोठी रक्कम जनता भरू शकत नाही.  त्यामुळे सामान्य जनतेला वीज बिल सरसकट ५० टक्के माफ करा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.

वीज बिल ५० टक्के माफ होत नाही तोपर्यंत भरू नका, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. कोरोनाच्या (Corona) संकटकाळात राज्य सरकारने मागील आठ  महिने लॉकडाऊन केले. लॉकडाऊनच्या काळात रोजगार, कामधंदा नसल्याने सामान्य जनता आर्थिक संकटाला तोंड देत आहे. अशा काळात राज्य सरकारने जनतेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. वीज बिलाची मोठी रक्कम जनता भरू शकत नाही.

त्यामुळे सामान्य जनतेला वीज बिल सरसकट ५० टक्के माफ करा, असे आठवले म्हणालेत. ग्राहकांनी वीज वापरली हे खरे असले तरी लॉकडाऊनच्या काळात जनतेला रोजगार, कामधंदा, आर्थिक उत्पन्न नसल्याने गरीब सामान्य माणसांचे हित पाहणे राज्य सरकारचे काम आहे. त्यामुळे वीज वापरली आहे तर सर्व वीज बिल भरा ही राज्य सरकारची भूमिका चूक आहे, असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER