मोदीजी, पृथ्वीराज चौहान यांनी केलेली चूक करू नका… कंगनाचा सल्ला !

Pm Modi - Kangana Ranaut

मुंबई :- शत्रूला माफ करण्याची, पृथ्वीराज चौहान (Prithviraj Chauhan) यांनी केलेली चूक तुम्ही ‘ट्विटर’बाबत करू नका, असा सल्ला अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranavat) हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना दिला. ट्विटरवर बंदी टाका, अशी मागणी तिने केली.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, ट्विटरने भारतातील काही अकाउंट्स ब्लॉक करण्यावर स्पष्टीकरण दिले होते. भारतातील काही अकाउंट्सला स्थानिक धोरणानुसार ‘ब्लॉकिंग ऑर्डर’मध्ये टाकण्यात आले, असे ट्विटरने सांगितले होते. यावरूनही कंगना ट्विटरवर बरसली. ‘तुम्हाला कोणी चीफ जस्टिस बनवले? अनेकदा तुम्ही पण गटबाजी करता आणि मग त्रासदायक हेडमास्तर बनता. अनेकदा तर स्वत:ला पंतप्रधान समजता. काही नशेबाजांचे गट तुम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत.’ असे कंगनाने लिहिले होते. यात कंगनाने जॅकला टॅग केले होते. कंगनाने ट्विटरला आता तुझी वेळ संपली आहे, अशा आशयाचे ट्विट करून ‘K00’ अ‍ॅपवर शिफ्ट होणार असल्याचे सांगितले होते.

कंगनाने ट्विट केले – आदरणीय पंतप्रधान, जी चूक महान योद्धा पृथ्वीराज चौहान यांनी केली होती ती तुम्ही अजिबात करू नका. त्या चुकीचे नाव होते माफी. ट्विटर कितीही वेळा क्षमा मागेल; पण क्षमा करू नका. त्यांनी भारतात गृहयुद्धाचा कट रचला होता, असे ट्विट कंगनाने केले आहे. कंगनाने याआधीच ट्विटर बॅन करण्याची मागणी केली होती. या ट्विटमध्ये त्यांनी #BanTwitterInIndia असा हॅशटॅगही लिहिला आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनाला विरोध करत ट्विट्स केले होते. त्यातील काही ट्विट्सवरून वाद निर्माण झाला होता. ट्विट्समध्ये कंगनाने निदर्शकांना खलिस्तानी, दहशतवादी म्हटले होते. या वादग्रस्त ट्विट्सपैकी काही ट्विट्स ट्विटरने डिलीट केले होते. त्याआधी तिच्या ट्विटर अकाउंटवर काही मर्यादा लादल्या होत्या. यामुळे कंगना संतापली आहे. बुधवारी ट्विटरने भारतातील काही अकाउंट्स ब्लॉक करण्यावर स्पष्टीकरण दिले होते.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी विरोधी कसे असतील? या अभिनेत्रीने केला प्रश्न उपस्थित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER