नुकसान पाहणी दौरा सहलीसारखा करू नका; ‘रयत क्रांती’चा मुख्यमंत्र्यांना टोमणा

रयत क्रांती संघटना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उद्या, १९ ऑक्टोबरला सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. पीडित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या, असे सुचवताना रयत क्रांती संघटनेने मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला आहे – नुकसान पाहणी दौरा सहलीसारखा करू नका.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने शेतीच्या पिकाचे होत्याचे नव्हत केले. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे (Heavy Rains) शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके लोळली आहेत.

मंत्री पाहणी दौरे करतात पण मदतीसाठी ठोस पातेले उचलली जात नाहीत, असा आरोप रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दीपक भोसले यांनी केला आहे. नुकसानग्रस्त भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात १ लाख रुपये मदत तात्काळ जमा करा, पंचमाने करून उर्वरित रक्कम नंतर द्या, अशी मागणी त्यांनी केली.

फक्त सहलीसारखे दौरे करू नका. येत्या दोन दिवसात प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख रुपये मदत जमा नाही केली. तर कोणत्याही मंत्री, आमदार, खासदारांनाच नाही तर मुख्यमंत्र्यांनाही सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दीपक भोसले यांनी दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis) राज्यातील काही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर असताना मुख्यमंत्र्यांना घर सुटेना; अशी खोचक टीका भाजपा करत होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १९ ऑक्टोबरला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER