छत्रपतींच्या घराण्यामध्ये कोणीही फूट पाडू नका- फडणवीस

Devendra fadnavis

मुंबई :- मागच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. तेव्हापासून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात टीव्ही-९ वृत्तवाहिनीशी बोलताना सत्ताधाऱ्यांना चांगलेच सुनावले. तसेच छत्रपतींच्या घराण्यामध्ये कोणीही फूट पाडू नका, असा सल्लाही दिला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करावं याबाबत फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, दोन्ही छत्रपती आमच्यासाठी आदरणीय आहेत. छत्रपतींच्या घराण्यात कुणीही फूट पाडू नये. नेतृत्व दोघांनीही करावं. दोघांमध्ये नेतृत्वासाठी वाद नाही. त्यामुळं कुणी तसा वाद लावू नये. छत्रपती संभाजीराजे यांच्या भरतीसंदर्भातील वक्तव्यात वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत सरकारनं भरतीचा निर्णय घेऊ नये. अशा प्रकारचा निर्णय घेताना सर्व घटकांशी चर्चा करण्याची गरज आहे. राज्याची स्थिती गंभीर असताना असे निर्णय घेताना विचार करावा.

दरम्यान, यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकार सध्या तीन पर्यायाने विचार करत आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे आणि खंडपीठाकडे जाणे. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाही. तिसरा पर्याय योग्य वाटतोय. आम्ही सरकारबरोबर आहोत, यात कुठलंही राजकारण आणणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER