अशोक चव्हाणांना फोन करुन काय करायचा , त्यांना या गोष्टी माहिती नाही का ? ; संभाजीराजे संतापले

Ashok Chavan - Sambhaji Raje

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) सुनावणी होती. मात्र, यावेळी राज्य सरकारचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्याने न्यायमूर्तींनी सुनावणी काही काळासाठी तहकूब केली. यावर संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या बेफिकीरीवर संताप व्यक्त केला .

तसेच यासंदर्भात अशोक चव्हाणांना फोन करुन काय करायचंय, त्यांना काय या गोष्टी माहिती नाही का? (MP Sambhajiraje Chhatrapati Criticize Ashok Chavan), मी आणखी नवीन काय सांगणार , असे म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला .

मी अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) परवाही फोन केला. त्यांना समितीची बैठक घ्यायला सांगितली. आता त्यांना वारंवार फोन तरी का करायचा? या गोष्टी त्यांना समजत नाही का?, सगळं समजतं, मी आणखी नवीन काय सांगणार”, असा उद्विग्न सवाल संभाजीराजेंनी केला.

हे दुर्दैव आहे की ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आपल्याला विचारतात की कुठे आहेत सरकारी वकील, तेव्हा ते तिथे हजर नसतात. आपले सरकारी वकील तिथे उपस्थित नसणे हे दुर्दैवं आहे, गंभीर आहे. त्यामुळे अशोकराव जिथे कुठे असतील तिथून कृपया कोऑर्डिनेट करा , अशी सूचना संभाजीराजेंनी केली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER