‘नुसते भाषण नको… आता तरी करून दाखवा!’ आशिष शेलारांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Ashish Shelar-CM Thackeray

मुंबई : कोरोनाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित काम केले नाही. कोरोनाची साथ रोखण्यात त्यांना यश मिळाले नाही. याबाबत ते काही तरी कारणे सांगतात. विरोधकांनी त्यांच्या उणिवा दाखवल्या की त्यांच्यावर राजकारण केल्याचा आरोप करतात. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी चार ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना – नुसते भाषण नको … आता तरी करून दाखवा ! असे आव्हान केले आहे.

राज्यात कोरोनाची साथ अजून वाढतेच आहे. या संकटात मदत जाहीर करण्याऐवजी ठाकरे म्हणतात आधी कोरोना हटवू मग मदतीचे पॅकेज जाहीर करू ! यावर टीका करताना आशिष शेलार यांनी ट्विट केले –

मुख्यमंत्री म्हणतात … आधी कोरोनाला हटवणार मग मदतीचे पॅकेज देणार … ! आमच्या कोकणी भाषेत “म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?”

मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करत होतात ते काय होते? फसवणूक?

मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करत होतात ते काय होते? फसवणूक? कोरोनाची साथ वाढण्यासंदर्भात आणि या साथीवर नियंत्रण आणण्याबाबतही मुख्यमंत्री ठाकरे वेगवेगळी वक्तव्ये करत असतात. त्याचा समाचार घेताना शेलार यांनी ट्विट केले आहे की –एकदा म्हणतात पावसाळ्यापूर्वी कोरोनातून महाराष्ट्राला मुक्त करू … आता म्हणता रुग्णांची संख्या वाढणार

 …एकदा म्हणता केंद्राच्या पथकाने आकडे दिलेच नाहीत … आता म्हणता पथकाने दिले त्यापेक्षा कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत …मा. महोदय, रोज भाषण दिशा बदलतेय ! अपेक्षित कामे झाली नाहीत म्हणून विरोधकांनी टीका केली की, मुख्यमंत्री विरोधकांवर राजकारण केल्याचा आरोप करतात. याला उत्तर देताना व मंत्री मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीत असे सूचित करताना शेलार म्हणाले की – राजकारण करू नका हे नेमकं कुणाला सांगताय?

खा. संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना ? ते खाजगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का? काय चाललंय काय? कळायला मार्ग नाही … म्हणे ‘आम्ही करणार म्हणजे करणारच !’ कधी? महाराष्ट्र हेच म्हणतोय साहेब आता तरी करून दाखवा !! कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी, महिला गट, बारा बलुतेदार, उद्योजक, कामगार सगळेच आर्थिक अडचणीत आहेत आहेत. राज्याची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्यात जमा आहे. मुंबईत ही स्थिती जास्तच गंभीर आहे. याचा समाचार घेताना शेलार यांनी ट्विट केले आहे की – अडचणीत आलेला शेतकरी, बारा बलुतेदार, महिला गट, छोटा उद्योजक, विद्यार्थी, कामगार आणि मुंबईकर करदाते … यांना काहीतरी मदत करावी असे वाटत नाही का? हॉस्पिटलमध्ये रुग्णांना घेतले जात नाही … रुग्णवाहिका, खाटा नाहीत … निष्पाप जीव जात आहेत. नुसते भाषण नको … आता तरी करून दाखवा !


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER