नुसते समर्थन नको, राड्यात उतरा; बाळा नांदगावकर यांचे भाजपाला आव्हान

Bala Nandgaonkar

मुंबई : वाढीव वीज बिले कमी करण्याबाबत सोमवारपर्यंत योग्य निर्णय झाला नाही तर सरकारविरुद्ध ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला आहे. मनसेच्या (MNS) आंदोलनाला भाजपाने पाठिंबा घोषित केला. पत्रकार परिषदेत भाजपाच्या समर्थनाबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी भाजपाला (BJP) आव्हान दिले – नुसते समर्थन नको, आमच्यासोबत राड्यात उतरा!

उल्लेखनीय म्हणजे, वाढीव वीज बिल माफीचा मुद्दा आधी भाजपाने उचलला होता. आता याबाबत मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) इशारा दिला – सोमवारपर्यंत याबाबत निर्णय झाला नाही तर राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू. नागरिकांनीदेखील यात सामील व्हावे. प्रचंड प्रमाणात आक्रोश असून जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.

बिल भरू नका – नांदगावकर
‘अनेक लोकांनी वीज बिले भरली आहेत; पण आमची विनंती आहे की, वीज बिल भरू नका’ असं म्हणत त्यांनी जनतेला वीज बिल तूर्त न भरण्याचे आवाहन केले आहे. एप्रिल-मे-जूनमधील वाढीव वीज बिले माफ करावी, अशी मागणी आम्ही केली होती. सरकारने टोलवाटोलवी करून जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप नांदगावकर यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER