फेरीवाल्यांच्या हक्काच्या कर्जात अडथळा करू नका : भाजपा

Kolhapur news.jpg

कोल्हापूर : कोरोनाचा (Corona virus) प्रादुर्भाव सुरू झाल्याने केंद्र शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊन (Lockdown) नंतर समान्य नागरीकांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरीता केंद्र शासनाने विविध आर्थिक पॅकेजे ची घोषणा केली. यामध्ये हातावर पोट असणार्‍या फेरीवाल्यांकरीता पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत (PM Swanidhi Yojana) बँकांमार्फत रू.१०००० तातडीने कर्ज देण्याची योजनाही आहे. या योजनेची सुरूवात जुलै २०२० मध्ये झाली आहे. परंतु या योजनेसाठी पात्र फेरीवाल्यांना हे कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत विविध बँका टाळाटाळ करत असल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे (Rahul Chikode) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहूल माने यांना भेटून निवेदन दिले.

यावेळी बोलताना भाजपा गटनेते अजित ठाणेकर म्हणाले, कोल्हापूर शहरात सुमारे ८ हजार नोंदणीकृत फेरीवाले असून आजपावेतो त्यांच्यापैकी २३२५ इतक्या फेरीवाल्यांनी या योजनेत अर्ज केले असून त्यापैकी ८४० अर्ज मंजूर तर केवळ ३५९ फेरीवाल्यांना कर्ज पुरवठा झाला आहे. इतर जिल्ह्यात या कर्ज वाटपाचे काम खूपच गतीने चालले असून कोल्हापूरात मात्र याबाबत बॅक अधिकार्‍यांत अनास्था दिसून येत आहे.

यावर उत्तर देताना आग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहूल माने यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांशी सहमत असल्याचे नमूद करून जनसामान्यांसाठीची योजना त्यांच्या पर्यंत पोचवण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगीतले. शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व तक्रारी या संबंधीत बॅंका पर्यंत पोहचवू व सर्व मुद्यांचे एकत्रित पत्रक काढून सर्व शाखा व्यव्स्थापकांना त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देऊ असे सांगितले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, अशोक लोहार, नजीर देसाई आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER