
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे यूपीएचे अध्यक्षपद येणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी सुरू होती. याबाबत शिवसेनेने काँग्रेसला सल्ला दिला होता, यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्या. यावर काँग्रेसचे नेते व मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शिवसेनेला फटकारले – शिवसेनेने यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत सल्ला देऊ नये. प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणालेत, शिवसेना यूपीएमध्ये सहभागी नाही. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरूनच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे यूपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये. याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते की, शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारले आहे. शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा यूपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. असा प्रस्ताव आला तर त्याचे समर्थन करू.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला