कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये : शरद पवार

Sharad Pawar

नाशिक : कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये; कांद्याबाबतचे बहुतेक निर्णय हे केंद्र सरकारच्या हातात असतात, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. बाजारातील चढ-उतार याची सर्वाधिक झळ कांद्याला बसते. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं.

राज्यात कांदा व्यापाऱ्यांवर केंद्राच्या सांगण्यावरून धाडी टाकण्यात येत आहेत. राज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी निर्यातबंदी आणि आयातीचा निर्णय केंद्रीय पातळीवरच होत असल्याचंही निदर्शनास आणून दिलं. कांद्याचा थोडा भाव वाढला की इन्कम टॅक्सवाल्यांच्या काही गोष्टी ऐकू येतात. मार्केट चालू ठेवा, अडचणी एकत्र बसून सोडवू, तुम्हाला त्रास झाला म्हणून उत्पादकाला त्रास व्हावा अशी तुमची भावना नाही. त्यामुळे थोडं नमतं घ्या, असा सल्लाही त्यांनी कांद्याच्या व्यापाऱ्यांना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER