काँग्रेसच्या चिखलफेकीत आम्हाला ओढू नका – वसुंधरा राजे

Vasundhara Raje

जयपूर: गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सुरू झालेल्या वादाचे परिणाम राज्यातील जनतेला भोगावे लागत आहे, हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे, असे वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे. काँग्रेस (Congress) आपल्या घरातील लढाईत भाजप (BJP) नेतृत्वाला दोष देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्या म्हणाल्या.

वसुंधरा राजे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, ‘काँग्रेसच्या अंतर्गत कलहांचा फटका राजस्थानच्या जनतेला आज सहन करावा लागला हे दुर्दैवी आहे. तर दुसरीकडे आमच्या राज्यात करोनामुळे ५०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि जवळजवळ २९ हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या बरोबरचआपल्या शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांवर टोळ सतत हल्ला करत आहेत. राज्यात आमच्या महिलांवरील अत्याचारांनी सीमा ओलांडल्या आहेत. राज्यातील वीजेची समस्याही वाढली आहे. या मी काही समस्यांचा उल्लेख करीत आहे. पण कॉंग्रेस मात्र भाजप आणि भाजप नेतृत्वाला दोष देण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारने जनतेचे हिताला महत्व दिले पाहिजे. कधी तरी जनतेच्या हिताबाबत विचार करा.’

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER