माझ्या नावाने राजकारण करू नका : संभाजीराजेंनी नगरसेवकांना फटकारले

sambhaji raje chhatrapati

कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार संभाजीराजे यांची भेट दिली नाही. या कारणास्तव कोल्हापूर महापालिकेची आज शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा रद्द करत असल्याचे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आणि महापौर निलोफर आजरेकर यांनी जाहीर केले होते. मराठा आरक्षण हा माझ्यासाठी राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे माझ्या नावाने राजकारण करू नका, पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली नाही, या कारणास्तव सभा तहकूब केल्याचे माझ्या वाचनात आले हा माझ्यासाठी मोठा धक्का असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.

पत्रात संभाजीराजे यांनी म्हटले की,

मी आज वर्तमानपत्रात बातमी वाचली, आणि मला आश्चर्य वाटले. मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकुब वारणे हे मी मान्य करतो, आणि समाजाच्या वतीने तुम्हा सर्व नेतेमंडळींचे आभारही मानतो. परंतु मला मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. यामुळे मी तुम्हा सर्वांवर नाराज आहे. गली 14 वर्षे मी

मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात सक्रिय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हे माझ्यासाठी राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. तुमचे माझ्या विषयीचे प्रेम समजू शकतो, पण गेल्या दीड वर्षापासून कोल्हापुरातील हजारो कोटी रुपयांचा गॅस पाईपलाईन चा प्रकल्प महापालिकेच्या परवानग्या वाचून रखडलेला आहे. त्या परवानग्या तुम्ही दिल्या असत्या, तर कोल्हापूरच्या विकासात फार मोठी भर पडली असती. हा प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे.

या योजनेमुळे सर्व कोल्हापूरकराचे भविष्य बदलून जाणार आहे. कोल्हापुरच्या सर्वांगीण विकासात ही योजना मैलाचा दगड़ ठरेल. आजच्या तहकूब झालेल्या सभेत या प्रकल्पाला परवानगी देणं आवश्यक होत. कोल्हापूरच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम च्या टर्फ करीता 5.50 कोटी रुपये केंद्राकडून मी मंजूर करून आणलेत. तिथे आतरराष्ट्रीय दर्जाने मैदान होणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मला समजते.

त्या संदर्भातील परवानगी या महासभेत दिली असती तर मला आनंद झाला असता. कोल्हापुरातून आंतरराष्ट्रीय स्तराचे हॉकी खेळाडू तयार झाले पाहिजेत हे माझं स्वप्न आहे. कोरोनाचा कोल्हापुरात सर्वाधिक प्रकोप वाढला आहे. त्यासाठी अधिक नियोजन करण्याची गरज आहे, त्यासंदर्भातीन उपाय योजना या महासभेत फेल्या असत्या तर त्या अधिक योग्य झाले असते, पण तुम्ही सर्वांनी ही महासभा माझ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या भेटीच्या संदर्भाला चुकीच्या पद्धतीने घेतले.

राहता राहिला मोदीजींच्या भेटीचा प्रश्न. आज पर्यंत मी जेव्हा केव्हा मोदीजींना वैयक्तिक भेटण्यासाठी गेलो तेंव्हा आमची भेट झालीच आहे. पण यावेळी माझी पंतप्रधानांना अशी मागणी होती की, महाराष्ट्रातील सर्व खासदारांना सोबत घेऊन भेट घ्यावी, पण कोविड मुळे इतक्या सर्वांना एकत्र येणं धोक्याचे ठरण्याची शक्यता असावी. त्यामुळे त्याना तशी वेळ देणं सध्या शक्य होत नसेल कदाचित, मला एकट्याला जाऊन भेटणं शक्य आहे. ठरवले तर कधीही भेटू शकतो. पण मला मराठा आरक्षणाच्या लक्षात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वाना सोबत घेऊन लहायचा आहे. तुमच्या माध्याविषयीच्या भावनेचा मी आदर करतो. आपण सर्व जण मिळन कोल्हापुरच्या विकासामाठी कार्य करत राह, मराठा आरक्षणाला यश हे मिळणार आहेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER