न अति विलम्बितमश्नीयात् – अति हळूहळू जेवण, पोषणास बाधा !

Slow Food Eating

अरे काय घाई आहे जरा हळू जेव ना! किंवा माझी गाडी सुटेल म्हणून भरभर तोंडात घास कोंबणे या घटना रोजच आपण घरात बघत वा बोलत असतो. याविरुद्ध बऱ्याच जणांना विशेषतः मुलांना टिव्ही मोबाईलसमोर तासन् तास ताट समोर ठेवून जेवण संपवायला लागणारा वेळ योग्य पोषण करत नाही.

आयुर्वेदात भोजन करतांना काय काळजी घ्यावी याचे वर्णन आहार विधिविधान या अंतर्गंत केले आहे. न अति विलम्बितम् अश्नीयात् म्हणजेच बराच वेळ वा थांबून थांबून जेवण करू नये. काय होते ? असा प्रश्न मुलं किंवा आपल्या मनातही येतोच. मुलांना जर कारणाचे योग्य स्पष्टीकरण दिले गेले तर पालन करणे सोपे जाते.

१. न तृप्तिमधिगच्छति – हळूहळू जेवण केल्याने तृप्ति होत नाही.
२. बहु भुङ्क्ते – हळूहळू किंवा थांबून थांबून जेवल्याने जास्त आहारमात्रा भुकेपेक्षा घेण्यात येते.
३. शीती भवति आहारजातं – हळूहळू जेवण केल्याने ताटातील अन्न थंड होऊन जाते.
४. विषमं च पच्यते – हळूहळू जेवण केल्याने आहाराचे पाचनही विषम रुपाने होते. कधी पाचन होते तर कधी होत नाही.

विलम्बित का जेवण करू नये याचे विस्तृत उत्तरे आचार्यांनी दिली आहेत.

मुलांना जेवू घालतांना हा विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मुलं एका जागी बसतात म्हणून हातात मोबाईल देणे किंवा टिव्हीवर उत्तेजना देणारे कार्टून बघणे यामुळे मन सतत त्यागोष्टींवरच केंद्रीत होते. याचा परीणाम आहाराच्या पचनावर व शेवटी पोषणावर रोगप्रतिकारक्षमतेवर पडतो. आयुर्वेदाच्या या भोजन नियमांची कारणमिमांसा जाणल्यावर ते पालन करणे सहज होऊ शकेल.

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button