विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करु नका, परीक्षा रद्द केल्यावरुन उच्च न्यायालयाने फटकारले

Exams - Bombay High Court

मुंबई : कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचं शिक्षण मंडळाने जाहीर केलं आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडसावले.

सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले. तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचाय का? करोनाच्या नावाखाली दहावीची परीक्षा रद्द करून तुम्ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारात ढकलू शकत नाही. तुम्ही विद्यार्थ्यांना कसं पास करणार आहात? त्यांना गुण कसे देणार आहात? या विद्यार्थ्यांची आतापर्यंत एकही परीक्षा झालेली नाही. पहिली ते आठवीची परीक्षा घेतली जात नाही. गेल्या वर्षी कोरोनामुळे नववीचीही परीक्षा घेतली नाही. त्यानंतर आता १० वीची परीक्षाही रद्द करण्यात आली. मग या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने पास करणार आहात? प्रत्येक वर्षी आपण विद्यार्थ्यांना प्रमोट करु शकत नाहीत. आपण शैक्षणिक दृष्ट्या मुलांचं नुकसान करु शकत नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले.

दहावीची परीक्षा ही शालेय शिक्षणानंतर सर्वात महत्त्वाची असते. ती रद्द करून तुम्ही शिक्षणव्यवस्थेचे नुकसान करताय असं म्हणत न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला खडसावले. जवळपास १४ लाख विद्यार्थी असलेल्या बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, मग जवळपास १६ लाख विद्यार्थी असलेल्या दहावीची परीक्षा रद्द का केली? असा भेदभाव का? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.

परीक्षा कधी तरी घ्यायला हवी. परीक्षा घ्यायचीच नाही, ही राज्य सरकारची भूमिका योग्य नाही. विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल कसा लावायचा, याविषयी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड या मंडळांची काही तयारी तरी आहे. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे गुणांकनाचे सूत्र बनवत असल्याचे ते म्हणत आहेत. महाराष्ट्राच्या एसएससी बोर्डाची काहीच तयारी नाही, परीक्षा रद्द करून गप्प बसले असं म्हणत न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारला चांगलेच सुनावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button