कृषी पंपाचा वीज पुरवठा तोडू नका- हर्षवर्धन पाटील

Agricultural Pumps - MSEDCL - Harshvardhan Patil

रेडा : वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने (MSEDCL) कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने सिंचनाअभावी पिके करपत आहेत. शेतीची वीज तोडण्याचे महाआघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi) धोरण शेतकरीविरोधी आहे. शेतकरी अडचणीत असल्याने महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता कृषी पंपाच्या वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशी मागणी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली.

पाटील यांनी आठवण करून दिली की, संपूर्ण कर्जमाफी व वीज बिल माफीचे आश्‍वासन दिलेले तीन पक्ष सध्या सत्तेवर आहेत. कोरोनामुळे (Corona) अनेक महिने बाजारपेठा ठप्प असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असतानाच महावितरणने देयकांच्या वसुलीसाठी १ फेब्रुवारीपासून कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करणे सुरू केले आहे. त्यामुळे विहिरींमध्ये पाणी असूनही शेतातील पिके करपत आहेत. ऊस व इतर पिकांच्या लावणी खोळंबल्या आहेत. यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी महाआघाडी सरकार जबाबदार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER