राष्ट्रवादीच्या नावाने रडत बसू नका : विश्वजीत कदम

Vishwajeet Kadam

सांगली : राष्ट्रवादी (NCP) हा आपला मित्रपक्ष खिंडार पाडत आहे, म्हणून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रडत बसू नये. आता झाले गेले विसरून जाऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा. आम्ही सर्व नेते एकत्रित तालुकानिहाय दौरा सुरू करणार आहोत. पदाधिकाऱ्यांनी देखील सक्रिय व्हावे, असे खडे बोल काँग्रेस नेते, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी सांगलीतील बैठकीत काँग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांना सुनावले.

काँग्रेसच्या ग्रामीण व शहरातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक ना. कदम यांनी नुकतीच काँग्रेस भवनमध्ये घेतली. त्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शैलजा पाटील, युवा नेते जितेश कदम, उपस्थित होते. आटपाडी, खानापूर, पलूस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे नेते पाहणी दौरे करतात पण पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत, उलट इतर पक्षाचे लोक त्यांच्याबरोबर असतात असे ते म्हणाले.

यावर ना. कदम यांचा पारा चढला. ते म्हणाले, मित्र पक्ष काँग्रेसच्या पदाधिकार्यांवर गळ टाकून त्यांना प्रवेश देत आहेत. मात्र गेलेले जाऊ देत. ते आपले तरी होते का, याचा विचार केला पाहिजे आणि कोण काय करतो याकडे लक्ष देण्याची ही वेळ नाही. पक्षातील मतभेद विसरून आपणही पक्षवाढीसाठी प्रयत्न करूया.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER