
मुंबई :- राजधानी दिल्लीत झालेल्या आज शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत, या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबींना केंद्र सरकारने बदनाम करु नये, त्यांच्याकडे सामंजस्याने पहावे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक मोदी सरकारने (Modi Government) करु नये.
पवार म्हणाले, “कृषी बिल सिलेक्ट कमिटीकडे न पाठवता गोंधळात सभागृह मंजूर करण्यात आली तेव्हाच मला वाटत होते की हे बिघडू शकते, शेतकरी वर्गाकडून यावर प्रतिक्रिया येऊ शकते. गेल्या ५० ते ६० दिवस पंजाब भागातील शेतकऱ्यांनी या कायद्यांसंबंधी भूमिका घेतली आणि अत्यंत शांततेत आंदोलन केले. केंद्राने यावर संयमाची भूमिका घ्यायला पाहिजे होती. मात्र, सरकारला आपला ‘स्टँड’ सोडायचाच नाही त्यामुळे सर्व चर्चा अपयशी झाल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला