शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर गर्दी करू नका, संभाजीराजे यांचे शिवप्रेमींना आवाहन

Chhatrapati Shivaji Maharaj - Shambhajiraje Chhatrapati

रायगड : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. एकचं धून सहा जून असं म्हणत दरवर्षी समितीच्या वतीने दरवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवप्रेमी भक्त रायगडावर आवर्जून हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक व शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा या सोहळ्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे यंदाचा शिवराज्याभिषेक घरीच राहुन साजरा करण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

याबाबत खुद्द संभाजीराजेंनी याबाबत माहिती देत शिवप्रेमींनी रायगडावर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. यंदाही हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरवले होते. सोहळ्याबाबत समितीचे पदाधिकारी व शिवभक्तांनी चर्चा करून जगभर पसरलेल्या कोरोना महामारीचे संकट पाहता समाजहीत डोळ्यासमोर ठेवून सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन केले आहे. सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे.

यावर्षीचा शिवराज्याभिषेक घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर फडकवावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, अशी विनंती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER