‘मला लॉर्डशिप असे संबोधू नका !’ पंजाब हायकोर्टाच्या न्यायाधीशाची विनंती

Arun Kumar Tyagi

चंदीगड : वकिलांनी न्यायालयात आपल्याला संबोधित करताना ‘युवर लॉर्डशिप’ किंवा ‘माय लॉर्ड’ हे शब्द वापरण्याचे टाळावे, अशी विनंती पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अरुणकुमार त्यागी यांनी केली आहे. न्या. त्यागी यांची ही इच्छा न्यायालयाच्या प्रशासनाने एक नोटीस प्रसिद्ध करून वकिलांना कळविली आहे. त्यात वकिलांनी ‘ओब्लाईज्ड’ व ‘ग्रेटफूल’ असे म्हणणेही टाळावे, असे न्या. त्यागी यांनी म्हटले आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनीही अशाच प्रकारचा ठराव गेल्या वर्षी केला होता. मद्रास उच्च न्यायालयाचे न्या. के. चंद्रू व आता ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झालेले न्या. एस. मुरलीधर यांनीही अशीच विनंती वकिलांना यापूर्वीच केली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने वकिलांनी नव्हे तर कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांनी उच्च न्यायालयाशी अधिकृत पत्रव्यवहार करताना ‘माय लॉर्ड’ व ‘युवर लॉर्डशिप’ हे शब्द न वापरण्याचे पत्र त्यांना पाठविले आहे.

याउलट सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेल्या कायद्याच्या एका विद्यार्थ्यास ‘युवर ऑनर’ असे संबोधन वापरले म्हणून ‘आम्ही दंडाधिकारी किंवा इंग्लंडमधील न्यायाधीश नाही’, असे सांगून फटकारले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER