फटाके फोडू नका; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लता मंगेशकर यांचा पाठिंबा

Lata Mangeshkar & Uddhav Thackeray

मुंबई : प्रदूषण टाळण्यासाठी दिवाळीत फटाके फोडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनीही ट्विट करून मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला पाठिंबा देत जनतेला फटाके न फोडण्याचे आवाहन केले. सरकार फटाकेबंदीचा निर्णय घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती.

मात्र, फटाकेबंदीचा निर्णय घेणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणालेत – “समाजाला, एकमेकांना त्रास न देता जेवढे मर्यादित फटाके तुम्ही फोडू शकता, ते फोडा. मी अगदीच काही आणीबाणी नाही आणत तुमच्यावर! फटाक्यांवर बंदीच घालतो असं न म्हणता, आपण एकमेकांच्या विश्वासावर हा सण आनंदाने साजरा करूया. ” यानंतर लता मंगेशकर यांनी ट्विट केले – “महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संवाद साधताना जे सांगितलं, त्याची अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. दिवाळीमध्ये कमी फटाके फोडा. प्रदूषण थांबवा. प्रकाशाचं पर्व साजरं करा. दिवाळी साजरी करा. मास्क अवश्य लावा. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER