‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा !’ अर्थसंकल्पावरून संजय राऊतांची टीका

Sanjay Raut

मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण  यांनी अर्थसंकल्प सादर केला. एकीकडे सत्ताधारी या अर्थसंकल्पाला देशासाठी पूरक असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली. या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधावा लागतो. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. राज्यानं देशाला सातत्यानं देण्याची दानत दाखवली आहे. महाराष्ट्र देशाचं पोट भरतो; पण राज्याकडं कोण पाहात नाही. सामान्य माणसाला पोटाची आणि भुकेची भाषा कळते. तरुणांना रोजगाराची भाषा कळते.

यांच्यासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद केलेली आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. राष्ट्रीय कोषातून निवडणुकांसाठी निधी वाटप सुरू आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. केंद्र सरकारनं सिंघू बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांचं ऐकावं, असंही संजय राऊत म्हणाले. लॉकडाऊनमुळे घरात बसलेले लोक पेट्रोलच्या दरवाढीमुळे घरात बसतील. ट्रोल डिझेलवर अधिभार लावून पेट्रोल १०० रुपये लिटर करून सर्वसामान्यांना सरकारला मारायचं असेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

तसेच, केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे परिणाम आगामी सहा महिन्यांत कळतीलच. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, अशी स्थिती केंद्र सरकारची झाली आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. हा देशाचा अर्थसंकल्प नसून तो एका राजकीय पक्षाचा अर्थसंकल्प आहे. आगामी काळात काही राज्यांत होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारने आर्थिक तरतूद केली असेल तर हा अर्थसंकल्प देशाचा नसून तो एका पक्षाचा अर्थसंकल्प म्हणावा लागेल, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER