प्लाझमासाठी सक्तीची वेळ आणू नका : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर : कोरोना (Corona) हा जात, पात, पंथ, गरिब-श्रीमंत पाहत नाही. कोरोनामुळे सर्व धर्मियानी या वर्षाचे सर्व सणउत्सव संयमाने साजरे केले. हे वर्ष फारच संकटाचे व दुखा:चे आहे. कोरोनामधून मुक्त झालेल्या व्यक्तींना जिवनदान देणे भाग्य फार थोडया व्यक्तींना मिळते. प्लाझ्मा दान करा, घाबरु नका. प्लाझ्मा दान करण्यासाठी सक्ती करण्याची वेळ आणू नका, मास्कचा वापर करा, नियमांचे पालन करा, लक्षणे दिसताच उपचार घ्या, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी केले आहे.

कोल्हापुरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्ये आढळत आहेत. यापार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरलाच पाहिजे. कोरोनापासून वाचण्याचा हा एकच उपाय आहे. मास्क गळयात अडकविणे, नाकाखाली घेणे हे धोक्याचे आहे. स्वतःसह आपले कुटूंब, मित्र परिवार, सगेसोयरे संक्रमीत होऊन त्यांनाही धोका होऊ शकतो. लक्षणे दिसताच दावाखान्यात जा, कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९९ टक्के असली तरी काळजी आणि समाजाच्या भितीने वेळाने दवाखान्यात गेले त्यातील ९० टक्के लोकांना जीव गमवावा लागला.

संक्रमीत लोकांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला, आपण किंवा आपले कुटुंबिय संक्रमीत झालेतर आपण काय करणार ? नवनविन औषधे येत आहेत, प्लाझ्माथेरपी सारखे उपचार रामबाण ठरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनीही कुटुंबियांना तब्येतीची माहिती कळवत रहिले पाहिजे. जोपर्यंत लस येणार नाही, तोपर्यंत घरात बसून चालणार नाही, कोरोना बरोबर जगून जिवन व्यतीत करण्यासाठी घ्यावी लागणारी सर्व खबरदारी घेवूया असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER