तिच्यावर विश्वास ठेवू नका, सुशांतने मला स्वप्नात येऊन सांगितले ! – शेखर सुमन

Sushant Singh Rajput - Shekhar Suman

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) तिच्यावर लावलेले आरोप एका मुलाखतीत खोडून काढले. म्हणाली – सुशांत माझ्या स्वप्नात आला होता आणि मौन सोडून बोलायला सांगितले. यावर रियाला टोमणा मारताना अभिनेता शेखर सुमनने (Shekhar Suman) ट्विट केले – … सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला की, तिच्यावर विश्वास ठेवू नका.

सुशांतच्या मृत्यूनंतर इतक्या उशिरा मुलाखत देण्याचे कारण सांगताना रिया म्हणाली – सुशांत माझ्या स्वप्नात आला होता आणि त्यानेच मला मौन सोडून यावर बोलायला सांगितले. म्हणाला सत्य सांग.

यावर शेखर सुमन यांनी रियाला टोमणा मारणारे ट्विट केले – ‘मला हे मान्य करावेच लागेल की, तिचा परफॉर्मन्स पाहून मी जरा चकितच झालो. तिने पूर्ण तयारीनिशी असे काही ऐकवले की मी भावुक झालो. तिचे अश्रू, निर्मलता, सुंदर अभिनय पाहून मीसुद्धा मग्न झालो. आणि मग अचानक सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, तिच्यावर विश्वास ठेवू नका.’

सुशांतच्या मृत्यूनंतर जे लोक या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी करत आहेत त्यात शेखर सुमनही आहेत. या केसची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनीही केली होती. सुशांतच्या वडिलांचे सांत्वन करण्यासाठी ते पाटणा येथेही गेले होते.

‘मला बाळ हवे होते’
रिया चक्रवर्ती मुलाखतीत म्हणाली, ‘आम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिले होते की, आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ. मला सुशांत सिंह राजपूतकडून बाळ हवे होते, जे हुबेहूब त्याच्यासारखे दिसले असते. मी त्याला ‘लिटील सुशी’ म्हणून हाक मारणार होते. तो पूर्णपणे सुशांतसारखा दिसला असता. आम्ही नेहमीच एका कपलसारखे बोलत होतो. आमची मैत्री प्रेमात कधी बदलली कळलेच नाही. सुशांतनेच आधी मला प्रपोज केले होते. माझ्या आयुष्यात येणाऱ्या लोकांमध्ये सुशांत सर्वांत इमानदार होता. सुशांतचे आणि त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते. त्यामुळे सुशांत नेहमीच तणावात असायचा.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER