निक किरयोसचा इतर टेनिसपटूंना सल्ला, ‘स्वार्थीपणा सोडून लोकांचाही विचार करा’

Nick Krygios

महिला टेनिसची नंबर वन खेळाडू, ऑस्ट्रेलियाच्या(Australia) ऍशली बार्टीपाठोपाठ फटकळ ऑस्ट्रेलियन टेनिसपटू निक किरयोस(Nick Kyrgios) यानेसुध्दा यंदाच्या युएस ओपन स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नेहमीप्रमाणे हा निर्णय घेताना किरयोसने इतर टेनिसपटूंवर टीका करणे सोडलेले नाही. कोरोनाच्या साथीच्या काळात हे खेळाडू आरोग्याच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करुन युएस ओपनमध्ये सहभागी होणार असल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली आहे. 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान युएस ओपन स्पर्धा खेळली जाणार आहे.

युएस ओपनसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळणार नसल्याचे मला मनस्वी दुःख आहे. परंतु मी माझ्या देशबांधवांसाठी आणि ज्यां शकडो, हजारो अमेरिकन नागरिकांनी आपले आयुष्य गमावले त्या लोकांसाठी मी हा निर्णय घेतला आहे असे किरयोसने म्हटले आहे.

या स्पर्धेचा कार्यक्रम किंवा त्यात खेळण्यास तयार असलेल्या खेळाडूंबद्दल त्याला समस्या नाही.जोवर प्रत्येक जण जबाबदारीने वागेल, सुरक्षितता राखेल तोवर आपल्याला काही समस्या नाही असे त्याने म्हटले आहे. या स्पर्धेठिकाणचा कामगार वर्ग जसे की, रेस्टॉरंटमधील कर्मचारी, सफाई कामगार, अटेंडन्ट यासारख्या लोकांना खेळ सुरु होण्याची गरज आहे हे आपण जाणून आहोत असे त्याने म्हटले आहे.

25 वर्षीय किरयोस हा क्रमवारीत 40 व्या स्थानी आहे. नोव्हाक जोकोवीचच्या एड्रिया टेनिस टूरच्या सामन्यांमध्ये खबरदारी न पाळल्याबद्दल आणि त्यामुळे जोकोवीचसह चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याबद्दल किरयोसने कठोर टीका केली होती. त्याबद्दल पुन्हा एकदा किरयोस म्हणतो की, टेनिसपटूंनी एक दुसऱ्याची काळजी घ्यायला हवी. तुम्ही मौजमजा करत फिरणे टाळायला हवे, पैशांसाठी युरोपभर फिरायला नको किंवा प्रदर्शनी सामने खेळायला नको, हा स्वार्थीपणा सोडून लोकांचा विचार करा हाच धडा ह्या विषाणूने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER