
अमरावती :- शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ईडीच्या नोटिसीवरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे . यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला . “आपल्या दमडीचाही हिशेब संजय राऊत यांनी ईडीला द्यावा, दमबाजी करू नये आणि भाजप दमबाजीला घाबरत नाही. ” असा जोरदार पलटवार शेलार (Ashish Shelar) यांनी केला.
सगळ्या एजन्सीवर दबावतंत्राचं राजकारण शिवसेना करू पाहात आहे. सर्व एजन्सीचं पावित्र्य जनता राखणार की नाही? हाच प्रश्न निर्माण होईल. भाजपा अशा कुठल्याही पक्षाला या एजन्सीवर दबावतंत्र करून काम करू देणार नाही. कंगना राणावत यांचं घर तोडताना मर्दानगी होती का? कंगना राणावत (Kangana Ranaut) यांना मुंबईमध्ये येऊ देणार नाही, त्यांचं तोंड फोडू असे बोलत होते तेव्हा शिवसेनेला मर्दानगी आठवली नाही का? त्यामुळे शिवसेनेने आधी स्वतःकडे बघावं, स्वतःच्या पायाखालची जमीन घसरली आहे. कर नाही तर डर कशाला, डर आहे म्हणूनच डराव डराव राऊतांनी केलाय, अशी टीका आशिष शेलार यांनी केलीय. संजय राऊत जे काही बोलत आहेत, ते सत्य नाही.
एका नोटीसमध्येच संजय राऊत पूर्ण हादरून गेले आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे. त्यांनी चूक केली नसेल तर त्यांना घाबरायचं कारण नाही. या देशात कायद्याचं राज्य आहे आणि त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशीही प्रतिक्रिया आशिष शेलारांनी दिली.
ही बातमी पण वाचा : नंगा आदमी हूँ, माझ्या नादी लागू नका, संजय राऊतांनी भाजपाला दिला दम
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला