अजितदादांचा राजीनामा सरळ मागा ना; भातखळकरांचा नवाब मलिकांना टोमणा

Atul bhatkhalkar - Nawab Mailk - Maharashtra Today
Atul bhatkhalkar - Nawab Mailk - Maharashtra Today

मुंबई : पश्चिम बंगालमधील भाजपाच्या पराभवावर टीका करताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यावर पंढरपूरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवाचा अजित पवार यांच्याशी संदर्भ जोडून भाजपाचे आ. अतुल भातखळकर यांनी मलिक (Nawab Mailk) यांना टोमणा मारला, अजितदादांचा राजीनामा मागायचाय तर सरळसरळ मागा. हे द्राविडी प्राणायम कशाला?

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट केले – “पश्चिम बंगालमधील मतदारांनी नाकारल्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, असं नवाब मलिक म्हणाले. अहो, नवाब मलिक अजित दादांचा (Ajit Pawar) राजीनामा मागायचाय तर सरळसरळ मागा. हे द्राविडी प्राणायम कशाला?”

पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदरवाराच्या प्रचारासाठी आघाडीच्या अनेक दिग्गजांनी सभा घेतल्या होत्या. यावरून भातखळकर यांनी टोमणा मारला – “पंढरपूरमधील महाभकास आघाडीचा पराभव म्हणजे ठाकरे सरकारला लोकांनी नाकारले असे मी म्हणणार नाही. यांना स्वीकारले कोणी होते? हे जबरदस्तीने जनतेच्या डोक्यावर बसले. समाधान आवताडे यांचा विजय हा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या अचूक रणनीतीचा परिणाम आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button