
पंढरपूर : चंद्रभागा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी सुरू आहे. यामुळे नदीकाठावरच्या मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. वाळूची चोरी करणारे वाळू वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर करतात. पोलिसांनी आता या गाढवांना तडीपार करून उटीला पाठवले आहे.
चोरांना पकडण्यासाठी धाड टाकली की, ते पळून गाढव सोडून जातात. पोलीस गाढवांना सोडून देत. वाळूचोर याचाच फायदा घेत होते. पोलिसांनी त्यावर उपाय शोधला. वाळूचोरी सुरू असताना धाड टाकली. नेहमीप्रमाणे चोर गाढवं सोडून पळून गेले. यावेळी पोलिसांनी वाळूचोरीसाठी वापरली जाणारी ३६ गाढवं पकडून आणली. दोन आठवडे त्या गाढवांना शहर पोलीस ठाण्यात ठेवले. गाढवं सोडवण्याला कोणी आले नाही म्हणून पोलिसांनी या गाढवांची रवानगी मोकाट प्राण्यांचे संगोपन करणाऱ्या उटी येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर अॅनिमल अॅण्ड नेचर संस्थेच्या कोंढवाड्यात केली. उटी हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे हे उल्लेखनीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला