ठरले! आयपीएल युएईमध्येच, १० नोव्हेंबरला अंतिम सामना

IPL 2020 - UAE

मुंबई : अखेर आयपीएल नेमके कधी आणि कुठे होणार हे स्पष्ट झाले आहे. इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) संचालन मंडळाच्या रविवारच्या बैठकीत ही स्पर्धा १९ सप्टेबर ते १० नोव्हेंबरदरम्यान युएईमध्ये खेळली जाणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही स्पर्धा युएईमध्ये घेण्यास केद्र सरकारने परवानगी दिली असल्याचे बीसीसीआयतर्फे सांगण्यात आले.

आतापर्यंत ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतिक्षा होती. ती आता मिळाली आहे आणि आधी ८ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार असल्याची शक्यता होती पण आता हा सामना १० नोव्हेबरला होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक संघात २४ खेळाडू असतील. शिवाय व्हिवो हेच स्पर्धेचे प्रायोजक असणार आहेत. सामने संध्याकाळी नेहमीसारखे ८ वाजता सुरू न होता अर्धा तास आधी म्हणजे साडेसात वाजता सुरु होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER