नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिरात १९ लाखांची देणगी

ambabai temple kolhapur

कोल्हापूर : कोरोनामुळे (Corona) नवरात्रौत्सवात (Navratri) अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) बंद असले तरी भाविकांनी देवीला १४० ग्रॅम ५५० मिली.चे दागिने अर्पण केले आहेत. त्यांची बाजारभावानुसार किंमत ७ लाख ६८ हजार ४८६ इतकी आहे तर ऑनलाईन ट्रान्स्फर झालेल्या ११ लाख २७ हजार ७१९ इतक्या रकमेसह सुमारे १९ लाख रुपयाची मंदिराच्या उत्पन्नात भर पडली.

कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने यंदा अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सवदेखील भाविकांविना पार पडला. दरवर्षी देवस्थानला या काळात २ कोटींचे उत्पन्न मिळते तर गेल्या सहा महिन्यांत १० कोटींच्या आसपास उत्पन्न घटले आहे. भाविकांना प्रवेश नसला तरी त्यांनी देवीला विविध प्रकारचे दागिने अर्पण केले आहेत. त्यात ठुशी, सोन्याची माळ, पेंडल, मंगळसूत्र या अलंकारांचा समावेश आहे. यासह भाविकांनी देणगी म्हणून ११ लाख २७ हजार इतकी रक्कम ऑनलाईन माध्यमातून देणगीच्या स्वरुपात दिली आहे.

देणगी देलेले दागिने असे

• सोन्याचे पेंडल (९ ग्रॅम ११० मिली) : ५२ हजार ४६८
ठुशी (७५ ग्रॅम) : ४ लाख ८ हजार
ठुशी (४२ ग्रॅम १०० मिली) : २ लाख २९ हजार
मंगळसूत्र (१० ग्रॅम २०० मिली) : ५७ हजार ५७३

• सोन्याची माळ (३ ग्रॅम १४० मिली) : १६ हजार ४२०

• सोन्याची नथ (१ ग्रॅम) : ५ हजार

• एकूण : १४० ग्रॅम ५५० मिली : ७ लाख ६८ हजार ४८६

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER