राम मंदिरासाठी नीलम गोऱ्हे व शिवसेना कुटुंबाकडून चांदीची एक किलो वीट दान

CM Uddhav Thackeray-Nilam Gorhe

मुंबई/पुणे :- अयोध्येतील राम मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. यासाठी अगोदरच शिवसेना (Shivsena) पक्षाच्यावतीने मदत करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातील अयोध्येच्या राम मंदिराच्या पुनर्बांधणी दरम्यान एक किलो चांदीची वीट शिवसेना आणि गोऱ्हे (Neelam Gorhe) कुटुंबीय यांच्यावतीने देण्याची इच्छा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रगट केली होती.

ही चांदीची वीट राम मंदिराचे ट्रस्टी यांच्याकडे दि.१६ नोव्हेंबर, २०२० बलिप्रतिपदाच्या शुभ दिवशी सुपूर्द करण्यात येणार आहे. आज दि. १२ नोव्हेंबर, २०२० रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या विटेचे पूजन मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी करण्यात आले. या चांदीच्या विटेवर पुढीलप्रमाणे मजकूर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER