
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात वर्गणी गोळा करणे सुरू आहे. यात अक्षयने दान दिले आहे. एक व्हिडीओ शेअर करत त्याने याची माहिती दिली. मी सुरुवात केली, तुम्हीही सहभागी व्हा; असे आवाहन केले.
अयोध्येत आपल्या प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर उभारणीचे काम सुरु झाले आहे.याचा खूप आनंद आहे. आता योगदान देण्याची वेळ आपली आहे. मी सुरुवात केलीये, तुम्हीही या मोहिमेत सहभागी व्हा. जय सियाराम, असे लिहित अक्षयने १ मिनिट ५० सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सेतू बांधण्यासाठी श्रीरामांना आपल्यापरीने मदत करणाऱ्या खारीची गोष्ट अक्षयने व्हिडीओत सांगितली आहे. रामसेतू बांधण्यासाठी चिमुकल्या खारूताईने, वानरांनी आपआपल्यापरीने योगदान दिले. आता राम मंदिर उभारण्यासाठी आपल्यापैकी काहींनी वानर बनून, काहींनी खारूताई बनून आपआपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, असे आवाहन अक्षयने केले आहे.
View this post on Instagram
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला