डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट ट्विटरने केले कायम बंद !

अमेरिकेच्या संसदेला घेराव घालत ट्रम्प समर्थकांनी प्रचंड धुडगूस घातला. या हिंसाचारानंतर ट्विटरने ट्रम्प (Donald Trump) यांचं ट्विटर अकाऊंट कायम बंद केलं आहे. ट्रम्प यांच्या ट्विटमुळे भविष्यातही हिंसेला चिथावणी देण्याची भीती व्यक्त करत ट्विटरनं ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट बंद केलं.

दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धिंगाणा घातला. संसदेत घुसून हिंसाचार केला. या घटनेनंतर ट्विटरनं ट्रम्प यांचे काही ट्विट्स डिलीट केले व त्यांचं अकाउंटही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

आता ट्विटरनं ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट कायम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही कालावधीत केलेले ट्विट आणि त्यांच्या संदर्भाची समीक्षा bकेल्यानंतर त्यांचं ट्विटर अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसा आणखी भडकावण्याची शक्यता असल्याने, ही कारवाई करण्यात येत आहे, असे ट्विटरने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER