कुछ ही घंटों में हम सबसे मिलेंगे !

भारतात येण्यासाठी निघाल्यानांतर ट्रम्प यांचे ट्विट

PM Modi - Donald Trump

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प थोड्याच वेळात भारतात पोहचतील. त्यांच्या भारत भेटीबाबत भारतात उत्साह आहे. ट्रम्प यांच्या स्वागत समारंभाचे ‘नमस्ते ट्रम्प’ असे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान, ट्रम्पही भारताच्या दौऱ्याबाबत अनेक दिवसांपासून उत्सुकता दाखवत आहेत. याबाबत त्यांनी अनेक ट्विट केले आहेत. भारतात येण्यासाठी निघाल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट केले आहे –

ट्रम्प यांचे अहमदाबाद येथे आगमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांचे स्वागत करण्यासाठी अहमदाबादला आहे आहेत. ते राजशिष्ठाचार बाजूला सारून विमानतळावर ट्रम्प यांचे स्वागत करतील. ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलानिया , मुलगी आणि जावई हे देखील आहेत.

अहमदाबाद विमानतळावरून ट्रम्प मोटेरा स्टेडियमवर जातील. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमासाठी मोटेरा मैदानाबाहेर गर्दी झाली आहे. मोदी-मोदी च्या घोषणा सुरू आहेत. स्वागत समारंभात सुमारे ३ हजार कलाकार भाग घेणार आहेत. विमानतळ ते मोटेरा स्टेडियम या २२ किलोमीटर लांब रस्त्यावर हजर असलेले लोक ट्रम्प यांचे स्वागत करतील.