डोनाल्ड ट्रम्प यांचा पद सोडताना पाकिस्तान आणि तुर्कीला दणका

Donald Trump

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही दिवसात पदावरुन पायउतार होणार आहेत. ट्रम्प यांनी पद सोलताना घेतलेल्या एका निर्णयाने भारताशी असलेली मैत्री राखलीच, सोबतच पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा दणका दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने ‘नाटो’मध्ये सहभागी असलेल्या तुर्कीला अमेरिकेत बंदी घातली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयम एर्डोगान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Turkey banned by US President Donald Trump)

अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे तुर्कीच्या अधिकारांवर करण्यात आलेला हल्लाच आहे, या शब्दात सेरेप तैयम एर्डोगान यांनी अमेरिकेच्या निर्णयावर टीका केली आहे. तुर्की हा सध्या असा एकमेव असा देश आहे जो पाकिस्तानशी जास्त जवळीक साधून आहे.

तुर्कीवर प्रतिबंध का?

अमेरिकेने सोमवारी तुर्कीच्या डिफेन्स इंडस्ट्री डायरोक्ट्रेट (SSB) आणि या कंपनीचे प्रमुख इस्माइल देमिर यांच्यावर प्रतिबंध लावला आहे. कंपनीच्या अन्य तीन कर्मचाऱ्यांवरही बंदी घातली आहे. रशियाच्या S-400 मिसाईल सिस्टिमच्या खरेदीच्या मुद्यावरून अमेरिकेने ही कारवाई केली आहे.

तुर्की ‘नाटो’सदस्य आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने केलेली कारवाई अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी एप्रिल २०१४ मध्ये रशिया आणि यूक्रेनमध्ये युद्ध सुरु होते. त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांमनी रशिया आणि यूक्रेनवर बंद घातली होती. त्यावेळी ओबामा यांनी ‘इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर अॅक्ट’ आणि ‘नॅशनल इमर्जन्सी अॅक्ट’चा वापर केला होता. इतकेच नाही तर रशियाशी मैत्री असलेले आणि त्यांच्याकडून शस्त्रास्त्र खरेदी करणाऱ्या भारतासह इतर देशांनाही ओबामा यांनी तंबी दिली होती.

भारताविरोधात अद्याप कुठलीही कारवाई नाही

भारताने रशियाकडून आतापर्यंत अनेकदा शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे. २०१८ मध्येही भारताने रशियाकडून 5 S-400 मिसाईलविरोधी यंत्रणेचा करार केला होता. अमेरिकेच्या विरोधानंतर भारिताने हा करार केला होता. अमेरिकेकडूनही भारताला वारंवार इशारा देण्यात आला आहे. इतकच नाही तर भारताला तुर्कीप्रमाणे प्रतिबंध लावण्याचा इशारा दिला आहे. पण भारतावर अद्याप अशी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.

तुर्की हा पाकिस्तानशी सर्वात जवळीक साधून असलेला देश आहे. काश्मीरमधील दहशतवाद म्हणजे अधिकारांची लढाई असल्याचे विधान तुर्कीने केले आहे. इतकच नाही तर तुर्कीच्या राष्ट्रपतींकडून अनेकदा काश्मीरमध्ये जनमत घेण्याची मागणी करण्यात आली आहे. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नका, अशी सूचना भारताने अनेकदा तुर्कीला दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER